Ganesh Chaturthi Modak Recipe in Marathi: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आपण जाणून घेणार आहोत कि गणपती बाप्पाला मोदक कसे बनवायचे।
तुम्हा सर्वांना माहीतच आहे कि आपल्या बाप्पा चे आगमन लवकरच होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही आगमनासाठी तय्यारी सुरु केली असेलच कारण गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर तय्यारी तर जोरातच होणार।
हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा सण जर कुठला असेल तर बरेच लोग गणपती बाप्पाचे आगमनच सांगतील आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या बाप्पाला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजेच मोदक आणि आपण सुद्धा आज जाणून घेणार आहोत कि गणपती बाप्पासाठी मोदक कसे बनवायचे आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने चला तर जाणून घेऊया।
मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
१ कप तांदळाचं पीठ
१ कप पाणी
१ चमचा तेल
चिमूटभर मीठ
१ कप किसलेला नारळ
१ कप गूळ
१/२ चमचा वेलदोडा पूड
थोडे तुप
वरील साहित्य आपण आपल्या पद्धतीने घेऊ शकता म्हणजे जर तुम्हाला खूप जास्त मोदक जर बनवायचे असेल तर तुम्ही जास्त Quntity मध्ये साहित्य घेऊ शकता आणि बनऊ शकता। म्हणजेच तुम्हाला Ganesh Chaturthi Modak Recipe in Marathi बनवायाला सोपे जाईल।
हे पण वाचा: How to Make Solkadhi Recipe in Marathi
मोदक बनवण्याची कृती:
आता मी तुम्हाला रेसिपी सांगतो तशाच पद्धतीने तुम्ही बनवा सर्वात आधी एक कढ़ाई घ्यायची आणि तिला स्वछ प्रकारे धून घ्यावी आणि एक कप पानी त्या कढ़ाई मध्ये टाका आणि जास्त गैस च्या उषणतेवर गरम करून घ्या।
पानी उकल्या मारतील अस ते पानी तापऊन घ्या आणि आता त्याच्या मध्ये एक चिमूठभर मीठ आणि एक टेबल स्पून तेल टाका म्हणजे आपला पीठ मोकल राहील आणि चिकटनार नाही।
आता ते जस जस पानी उकलल त्यामध्ये तांदळाचं पीठ त्या उकळत्या पाण्यात टाका आणि ते टाकत असताना त्याला सारखं हलवत राहा म्हणजे त्याचे गोळे होणार नाही आणि त्याच्या अजिबात गुठळ्या होऊ देऊ नका नाही तर रेसिपी खराब होऊन जाईल।
जो पर्यंत कढईतील पाणी पूर्ण तांदळाचे पीठ ओब्जेर्व करत नाही तो पर्यंत त्याला घोटत राहा आणि जसे पाणी पूर्ण निघून जाईल तेव्हा गैस बंद करून घ्या।
आणि त्याला खाली उतरवून १० ते १५ मिनिटे थंड होऊ द्या आणि त्याच्यावर झाकण जरूर ठेवा म्हणजेच पीठ व्यवस्थित राहील.
एका कढईत थोडं तूप घालून गरम करा, आणि त्यात बारीक किसलेला नारळ आणि दुकानातील शुद्ध गूळ घाला आणि मिश्रण एकदम चांगल्या प्रकारे शिजवा जोपर्यंत गूळ पूर्ण पने नहिसा होत नहीं तोपर्यंत।
आणि नारळाचा खीस चांगला मिक्स झाला की वेलदोड्याची पूड घालून मिश्रण मिक्स करा आणि गॅस बंद करा करून टाका।
तांदळाचं पीठ अजून गरम गरम असताना चांगले मळून घ्या आणि त्याचे लहान लहान गोळे बनवा प्रत्येक गोळा हाताने पारीसारखा पातळ लाटून घ्या, त्यात सारण घालून, पारीच्या कडा एकत्र आणून मोदकाचा आकार द्या सर्व मोदक तयार करून घ्या.
आता शेवटची स्टेप आपल्या घरात आपण इडली खातों त्या इडली च्या भांड्यात किंवा मोदक पात्रात परत एकदा पाणी गरम करा, आणि त्यावर मोदक ठेवून १५-२० मिनिटं वाफवा आणि मोदक चांगल्या प्रकारे तयार झाल्यावर त्यावर तुपाचं फोडणी द्या.
या प्रकारची सोपी आणि साधी रेसिपी बघून तुम्ही आरामशीर दुकानात मिळणाऱ्या मोदका पेक्षा मऊ आणि लुसलुशीत मोदक घरच्या घरी बनवू शकता आणि पूर्ण ११ दिवस तुम्ही गणपतीला मोदक प्रसाद म्हणून देऊ शकता तर ह्या काही स्टेप आहे मोदक बनवायच्या तुम्हाला नक्कीच आवडले असेल
हे पण वाचा: भाजलेले चणे: चवीला मसालेदार आणि बनवायला सोपे
मोदकाचे वेगवेगळे प्रकार आहेत, जे त्यांची चव, बनवण्याची पद्धत आणि वापरलेल्या साहित्यात भिन्न आहेत. खाली काही लोकप्रिय प्रकार आहेत:
उकडलेले मोदक:
खासियत: पारंपारिक मोदक, जे नारळ आणि गुळाने भरलेले वाफवलेले तांदळाचे पीठ आहे.
चव: मऊ आणि लवचिक, तुपाने रंगवलेला.
उपयोग : गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी खास.
तळलेले मोदक:
खासियत: हे मोदक तेलात तळलेले, नारळ, गूळ, खवा किंवा ड्रायफ्रूट पेस्टने भरलेले, तांदूळ किंवा गव्हाच्या पिठापासून बनवले जातात.
चव : खुसखुशीत आणि गोड.
उपयोग: दीर्घकाळ टिकणारे, प्रवासात किंवा सणांसाठी उपयुक्त.
चॉकलेटचे मोदक:
खासियत: चॉकलेट वापरून बनवलेले आधुनिक प्रकार.
चव : गोड आणि चॉकलेटी.
उपयोग: मुलांनी पसंत केलेले, अर्पणचे विशेष स्वरूप म्हणून दिले जाते.
खव्याचे मोदक :
खासियत: खवा पिठात सुका मेवा किंवा गूळ भरून बनवतात.
चव: समृद्ध आणि मलईदार.
उपयोग : गणपती उत्सवात खास प्रसाद म्हणून.
ड्रायफ्रुट्स मोदक:
खासियत: परी किंवा सारण या दोन्हीमध्ये विविध ड्रायफ्रुट्स वापरतात.
चव : पौष्टिक व कुरकुरीत.
उपयोग: कमी साखर वापरणारा एक आरोग्यदायी पर्याय.
पांढरे गोड (साखरमुक्त) मोदक:
खासियत: गुळाऐवजी खजूर किंवा गोड न केलेले पर्याय वापरले जातात.
चव: गोड, परंतु साखरमुक्त.
उपयोग: मधुमेही आणि आरोग्याविषयी जागरूक लोकांसाठी उपयुक्त.
फळांचे मोदक:
खासियत: फळांचा लगदा किंवा रस वापरून बनवले जाते.
चव: ताजे आणि फळेयुक्त.
उपयोग: एक हलका, आरोग्यदायी पर्याय.
केशर मोदक:
खासियत : केशर आणि वेलची पावडर वापरून मोदक तयार केले जातात.
चव: सुवासिक आणि चवीने समृद्ध.
उपयोग: विशेष प्रसंगी ऑफर करण्यासाठी.
या विविध प्रकारच्या मोदकांना त्यांच्या आगळ्या-वेगळ्या चवीमुळे आणि बनवण्याच्या पद्धतींमुळे गणेशोत्सवात विशेष स्थान आहे.
हे पण वाचा: झटपट शेव व्हेज रेसिपी मराठी
मोदकासाठी कोणतं तांदळाचं पीठ वापरावं?
मोदकासाठी विशेषतः तांदळाचं बारीक पीठ वापरावं. आपण घरात तयार केलेलं तांदळाचं पीठ किंवा बाजारातून मिळणारं तांदळाचं पीठ वापरू शकता.
मोदक वाफवताना त्यांची पारी फाटण्याचं कारण काय असू शकतं?
पारी फाटण्याचं मुख्य कारण म्हणजे तांदळाचं पीठ योग्य प्रमाणात मळलं नसेल किंवा पारी खूप पातळ केली असेल. पिठाचं प्रमाण बरोबर ठेवून मऊ पारी तयार करा.
मोदक वाफवण्यासाठी किती वेळ लागतो?
साधारणपणे १५-२० मिनिटं मोदक वाफवण्यासाठी पुरेशी असतात. पारी पारदर्शक दिसू लागली की मोदक तयार झाले आहेत.
मोदक वाफवल्यानंतर त्यांच्या कडा कोरड्या का होतात?
कडा कोरड्या होऊ नयेत यासाठी मोदक तयार करून लगेच वाफवावे. जर कडा कोरड्या होऊ लागल्या तर पाण्याचा स्प्रे मारून थोडा ओलावा आणावा.
मोदकांचा नैवेद्य कसा द्यावा?
मोदकांना तुपाचं फोडणी घालून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. नंतर प्रसाद म्हणून सर्वांना वाटावा.