१० सोपे उपाय पैशांचे व्यवस्थापन करण्यासाठी: Personal Finance Tips For Beginners In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच आजच्या या ब्लॉग मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत Personal Finance Tips For Beginners In Marathi म्हणजेच कि आपल्या लाईफ मध्ये आपण पैशाची बचत कश्या प्रकारे केली पाहिजे।

आणि त्याचबरोबर आपले जे financial प्रॉब्लेम असतात ते आपण कशा योग्य पद्धतीने manage करू शकतो आणि आपल्या भविष्यासाठी व येणाऱ्या आपल्या पिढीसाठी आपण पैशाची बचत कशा प्रकारे करू शकतो।

कारण असा कोणताही व्यक्ती नसेल कि त्याच्या लाईफ मध्ये या प्रकारचे प्रॉब्लेम नसतील म्हणूनच आपण आधीच या गोष्टींचे नियोजन केले पाहिजे नाही तर येणाऱ्या काळात खूप जास्त प्रॉब्लेम चा सामना करावा लागू शकतो।

चुकीचे आर्थिक निर्णय भविष्यामध्ये मोठ्या समस्या निर्माण करू शकतात, म्हणून सुरुवातीपासूनच योग्य पद्धतीने वैयक्तिक वित्तीय व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

तर आम्ही या ब्लॉग मध्ये अशा काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे कि ज्या आपल्याला पैशाची बचत करण्यास खूप मदत करेल आणि तुम्ही पैशे खर्च करण्याच प्रमाण कमी कराल।

बजेट तयार करा (Create a Budget)

Personal Finance Tips For Beginners In Marathi

बजेट म्हणजे काय, तर बजेट म्हणजे कि आपण जे पण पैशे कमवतो त्याचा खर्च कशा प्रकारे वाटला जातो त्याला बजेट म्हणतात आणि सर्व व्यक्तींनी ह्या गोष्टीचे पालन केले पाहीजे।

म्हणजे आपल्याला खर्च करताना जास्त काही प्रॉब्लेम होणार नहीं आणि प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक महिन्याचं बजेट हे केलच पाहिजे. जेणे करून आपल्या कढून होणार खर्च खूप जास्त कमी होऊ शकतो आणि आपल्याकडून फालतू खर्च कमी होतो.

  • प्रत्येक महिन्याचे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसवा.
  • अनावश्यक खर्च ओळखून ते कमी करण्याचा प्रयत्न करा.
  • मोठ्या खर्चासाठी आधीपासून योजना करा.

हे पण वाचा: [SBI] State Bank of India Recruitment 2024

इमर्जन्सी फंड ठेवा ( Keep An Emergency Fund )

Personal Finance Tips For Beginners In Marathi

आता च्या काळामध्ये जर विचार केला तर इमर्जन्सी फंड ठेवणे खूप महत्वाचे आहे कारण माणसाला कधी काय होईल आणि कधी पैसे लागतील हे सांगू नाही शकत. सगळ्यात जास्त जर इमर्जन्सी मध्ये पैसे लागत असतील तर ते म्हणजे हॉस्पिटल मध्ये।

जसे की आरोग्यविषयक इमर्जन्सी परिस्थिती मध्ये किंवा कामाच्या ठिकाणी काही अडचणी अशा वेळी आपल्याकडे इमर्जन्सी फंड असणे खूप आवश्यक आहे.

  • किमान ३ ते ६ महिन्यांचा खर्च इमर्जन्सी फन्डिंग मध्ये ठेवा.
  • या निधीचा वापर फक्त इमर्जन्सी परिस्थितीत करा.

कर्ज कमी करा (Reduce Debt)

आपण सध्या सगळ्यात मोठी चूक जर करत असेल तर ती म्हणजे कर्ज घेणे आपल्याला कधी कधी पैशाची गरज सुद्धा नसते तरी सुद्धा आपण कर्ज घेतो आणि कर्जामुळे तुमच्यावर आर्थिक भार येऊ शकतो. कर्ज घेण्याचे टाळा आणि कर्जावरील व्याज कमी करण्यासाठी वेळेवर पैसे भरा.

  • कर्ज घेतल्यास ते वेळेवर फेडण्याची योजना करा.
  • जास्त व्याजाची कर्जे प्रथम फेडून द्या.
  • शक्य असल्यास, कर्ज घेण्याऐवजी बचतीसह खरेदी करा.

हे पण वाचा: पीएम योजना घर बसल्या 8000 कमवा

सुरुवातीपासून बचत करा (Start Saving Early)

जर आपण लहान वयातच बचतीची सवय लावली तर भविष्यातील आर्थिक स्थैर्यासाठी ती अधिक महत्त्वाची ठरते शक्य तितकी बचत करण्याचा प्रयत्न करा.

तुम्ही जितके जास्त बचत कराल तितके तुमच्या भविष्यासाठी चांगले आहे आणि प्रत्येक व्यक्तीने सुरुवातीपासूनच बचत केली पाहिजे.

  • उत्पन्नातील काही टक्के बचतीसाठी ठेवा.
  • SIP, म्युच्युअल फंड किंवा इतर गुंतवणुकीद्वारे तुमची बचत वाढवा.

सेवानिवृत्तीची योजना करा (Plan for Retirement)

सेवानिवृत्तीमध्ये आर्थिक स्थैर्य आवश्यक असते, त्यामुळे जितक्या लवकर तुम्ही निवृत्तीसाठी बचत सुरू करू शकता तितके तुमच्यासाठी चांगले आहे। म्हणजेच तुम्ही एखाद्या सर्विस ला आहे कीवा गोवर्मेंट जॉब ला आहे आणि तुम्हाला भरपूर वर्ष जालेले आहे सर्विस देऊन तर तुम्ही लवकरच याच नियोजन करू शकता।

  • EPF (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी), PPF (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी) किंवा NPS (नॅशनल पेन्शन स्कीम) मध्ये गुंतवणूक करा.
  • दीर्घकालीन स्थिर उत्पन्न देणाऱ्या योजनांचा विचार करा.

आर्थिक ध्येये सेट करा (Set Financial Goals)

तुमच्या आयुष्यात आर्थिक उद्दिष्ट असणे महत्त्वाचे आहे त्यासाठी लहान-मोठ्या आर्थिक उद्दिष्टांचे नियोजन करणे आवश्यक आहे. म्हणजेच तुम्हाला टारगेट ठेवाव लागेल जी गोष्ट तुम्हला भविष्यात घ्यायची आहे मग ती गोष्ट छोटी असो कीवा मोठी असो।

जसे की समजा तुम्हाला एक कार घ्यायची आहे पण ती तुम्ही लगेच नहीं घेऊ शकत कारण तुमच्या कडे फंडिंग अवलेबल राहत नाही त्यासाठी आर्थिक नियोजन करने खूप महत्वाचे असते।

म्हणजेच जी गोष्ट आपल्याला घ्यायची आहे तीच आपण आधीच नियोजन करून ठेऊ शकतो आणि ती गोष्ट आपण घेऊ शकतो।

  • छोटी उद्दिष्टे (जसे की कार खरेदी करणे) आणि मोठी उद्दिष्टे (जसे की घर खरेदी करणे) सेट करा.
  • उद्दिष्टांवर आधारित बजेट तयार करून बचत करण्यास प्रारंभ करा.

हे पण वाचा: घरच्या घरी बनवा बाप्पांसाठी स्वादिष्ट मोदक 

गुंतवणूक करा (Invest Wisely)

जर आपण फक्त बचत करायच्या माघे जर लागलो तर हे पुरेसं नाही आपल्या सेविंग साठी कारण जेव्हा आपल्या जवळ किंवा आपल्या आसपास जरा पैसा असेल तर आपल्याला काही न काही सुचतच राहत आणि जे पैशे आपल्याजवळ आहे ते सुद्धा खर्च करून टाकतो.

आणि जर का ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला टाळायच्या असतील तर सगळ्यात बेस्ट तरिका जर कोणता असेल तर तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट. आपण जर चांगल्या ठिकाणी जर पैसे इन्व्हेस्ट केले तर आपल्याला चांगल्या प्रकारचे रिटर्न सुद्धा मिळतात आणि हे पैसे जेवढे वर्ष तुम्ही ठेवाल तेवढे ते वाढत जाईल

  • म्युच्युअल फंड, शेअर्स किंवा सोन्यात गुंतवणूक करा.
  • धोके ओळखून गुंतवणुकीची योजना करा.
  • दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) विचारात घ्या.

वित्तीय ज्ञान वाढवा (Increase Financial Literacy)

आर्थिक क्षेत्रातील संकल्पना आणि उत्पादने समजून घेणे आवश्यक आहे. तुमचे आर्थिक ज्ञान जितके अधिक असेल तितके तुमचे निर्णय चांगले असतील.

  • आर्थिक पुस्तके वाचा किंवा ऑनलाइन कोर्स करा.
  • तुमच्या बँक किंवा वित्तीय सल्लागाराशी बोलून विविध आर्थिक संकल्पना जाणून घ्या.

विमा घ्या (Get Insured)

लाइफ इन्शुरन्स आणि आरोग्य विमा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देऊ शकतात. आकस्मिक आजार किंवा अपघातामुळे आर्थिक बोजा पडण्याची शक्यता टळू शकते.

  • लाइफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स घ्या.
  • तुमच्या आवश्यकतेनुसार योग्य विमा योजना निवडा.

अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा (Control Non-Essential Expenses)

आर्थिक स्थैर्यासाठी केवळ जीवनावश्यक गोष्टींवरच खर्च करणे अत्यंत आवश्यक आहे. गैर-व्यावसायिक खर्चांवर नियंत्रण ठेवल्याने तुमची बचत जास्तीत जास्त होण्यास मदत होईल.

  • अनावश्यक खरेदी करणे टाळा.
  • विक्री आणि ऑफरमुळे फसण्याऐवजी योग्य किंमतीत खरेदी करा.

बजेट तयार करणे का आवश्यक आहे?

स्पेशलायझेशनमुळे तुम्हाला तुमचे उत्पन्न आणि खर्च संतुलित करता येईल. तसेच, खर्च ओळखणे, निसर्ग बचतीची विविधता वाढवणे यावर नियंत्रण ठेवणे शक्य होते.

आपत्कालीन निधी कशासाठी असावा?

अनपेक्षित खर्चासाठी (जसे की आरोग्य आणीबाणी) आपत्कालीन निधी बाजूला ठेवावा. हा निधी अचानक आलेल्या आर्थिक संकटापासून संरक्षण देतो आणि कर्ज घेण्याची गरज टाळतो.

कर्ज घेतले तर नियोजन कसे करायचे?

तुम्ही कर्ज घेत असाल तर ते लवकर फेडण्याची योजना करा. आधी जास्त व्याजाची कर्जे फेडा आणि शक्य असल्यास कमी व्याजाची कर्जे निवडा. कर्ज न घेण्याचा प्रयत्न करा, जतन करा आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा खरेदी करा.

लवकर बचत करून काय फायदा?

सुरवातीपासून बचत केल्याने तुम्हाला जास्तीत जास्त वेळ मिळतो, ज्यामुळे तुमची बचत वाढते. तसेच, लहान वयात केलेल्या बचतीमुळे गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळतो, ज्यामुळे भविष्यातील आर्थिक स्थैर्य सुरक्षित करणे सोपे होते.

सेवानिवृत्तीचे नियोजन केव्हा सुरू करावे?

निवृत्तीचे नियोजन जितक्या लवकर सुरू कराल तितके चांगले. तरुण वयात निवृत्ती बचतीला सुरुवात केल्यास जास्त निधी जमा होऊ शकतो, ज्यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही.

Scroll to Top